vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शुक्रवार दि.28/03/2025 रोजी सी.बी.डी.. सेक्टर-28 येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. याकामासाठी सदर मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा शुक्रवार दि.28/03/2025 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत एकूण 07 तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात शुक्रवार दि.28/03/2025 रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच याकालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच शनिवार ‍दिनांक 29/03/2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.   याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, याकालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

0000000

संबंधित पोस्ट

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

vishwatmaklokswamivarta

थोरियम अणुभट्टी विकासासाठी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार..

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

विशेष लेख -‘डिजिटल महाराष्ट्र’च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!