vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नव्या मुंबईतील*रूग्णालयीन सुविधा अधिक गुणवत्तापूर्ण करण्याकडे आयुक्त यांचे विशेष लक्ष*

नव्या मुंबईतील*रूग्णालयीन सुविधा अधिक गुणवत्तापूर्ण करण्याकडे आयुक्त यांचे विशेष लक्ष*

 

         नवी मुंबई प्रतिनिधी राजमाता जिजाऊ रूग्णालयाची पाहणी करताना आयुक्तांनी चारही मजल्यांवरील सर्व सुविधांची पाहणी करीत अपघात विभागात पोर्टेबल एक्स रे आणि सोनोग्राफी मशीन ठेवण्याचे सूचित केले. त्याठिकाणच्या फार्मासिस्ट स्टोअरमध्ये रॅक वाढविण्याच्या सूचना करण्यासोबतच सर्वच मजल्यांवर दर्शनी भागात असलेल्या रिकाम्या भिंतींवर आरोग्यविषयक सुविधा व नागरिकांना करावयाच्या आरोग्यविषयक सूचनांची व्यापक व आकर्षक प्रचार – प्रसिध्दी करण्याचे सूचित केले. यामध्ये विशेषत्वाने रूग्णांसाठी महत्वाचे आभा स्कॅनींग कोड प्रदर्शित करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याठिकाणी रक्तपेढी सुविधा व ब्रेस्ट मिल्क बँक कार्यान्वित करण्याची कार्यवाही जलद करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. रूग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी उपहारगृह रात्रीही सुरू ठेवावे असे सूचित करतानाच तेथील पदार्थ गुणवत्तापूर्ण व दर्जेदार राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. याठिकाणी कॅन्सर तपासणी डेस्क लावावा व त्याची प्रचार-प्रसिध्दी करावी, जेणेकरून महिलांना त्याची माहिती मिळून लाभ घेता येईल असेही निर्देश आयुक्तांनी दिले. येथील रिपोर्टींग बोर्ड डिजीटल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने स्वच्छता, अभ्यागतांना सुविधा व अभिलेख वर्गीकरण आणि जतन, टाकाऊ वस्तूंचे निर्लेखन आदी बाबी काटेकोरपणे व्यवस्थित करण्याकडे लक्ष देण्याचेही निर्देशित करण्यात आले.

——-“महापालिका रूग्णालयांत उपचारासाठी येणा-या रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेच्या अनुषंगाने रूग्णांना औषधे रूग्णालयातूनच मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्यासोबतच त्यांना देण्यात येणा-या अन्नाच्या गुणवत्तेकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच आजार होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीविषयक माहिती मोठ्या प्रमाणात प्रसिध्द करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. आरोग्य सेवा सक्षमीकरणाच्या दृष्टीने 620 पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ नर्स भरती होत असून डॉक्टरांच्या उपलब्धतेकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.” – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त

**

संबंधित पोस्ट

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी