vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

रायगड( प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.03 एप्रिल रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत तनिष हॉटेल अँड रिसॉर्ट, प्लॉट नं. 27, मेन रोड, हिंडाल्को कंपनी समोर, एम.आय.डी.सी. तळोजा, ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील बेरोजगारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु. पवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापनांमधील रिक्तपदांसाठी भरती केली जाणार आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवीधर आणि इतर पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया: उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर जाऊन Employment Job Seeker या पर्यायातून लॉगिन करून शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी आणि Pandit Dindayal Upadhyay Job Fair या पर्यायामधून जिल्हा निवडून ऑनलाईन अर्ज करावा.

इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांनी https://cmykpy.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर Intern Login द्वारे लॉगिन करून Apply for Jobs वर क्लिक करावे आणि आपला जिल्हा निवडून उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास 02141-222029 या क्रमांकावर किंवा श्री. महेश भा. बखरे (मो. 9421613757) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धा -मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात मुंबई विभागास विजेतेपद- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडुंना पारितोषिक वितरण..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना…

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन