vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य प्रतिनिधी-कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी. तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील कर्करोग प्रतिबंध, जनजागृती आणि वेळेवर निदानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा मंत्री श्री.आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीस सहसंचालक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य भवन, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिमंडळांचे उपसंचालक, तसेच या जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम २०२५ तसेच कर्करोग निदान वाहनाच्या माध्यमातून होणाऱ्या तपासण्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात ठाणे, पुणे आणि नाशिक या परिमंडळांतील कामकाजावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी मंत्री श्री.आबिटकर यांनी नवीन डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी सूचना करून सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे धुलाई सेवा व आहार सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्याही सूचना दिल्या. या मोहिमेमुळे राज्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

लम्पी आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी उपाययोजना राबवावी;लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम..

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियरॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta