vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक,असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात,पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ…

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक,असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात,पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ…

मुंबई, प्रतिनिधी:

देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.

श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.

नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.

कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी पत्रकारांसाठी चित्रपट रसास्वाद शिबिर संपन्न माध्यम प्रतिनिधींना चित्रपटांची सखोल जाण देण्याचा पीआयबीचा स्तुत्य उपक्रम

vishwatmaklokswamivarta

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कार्तिक आर्यन आणि मामुट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आर्टिकल ३७० सर्वोत्कृष्ट चित्रपट

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित “उदयपूर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला

इफ्फीमध्ये उलगडले ‘निलगिरीज’, ‘मु. पो. बॉम्बिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन चित्रपटांचे सिने विश्व

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta