vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन…

अहिल्यानगर, प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.

सूतगिरणीमुळे परिसरात नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे परिसरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तसेच रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्यामुळे या परिसरातील दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्र रस्ते विकास संस्थे अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुतगिरणी याच रस्त्यावर होत असल्याने ५. ५० मीटर डांबरी धावपट्टी प्रस्तावित करुन राज्य शासनाने नव्याने या रस्ता कामाला मान्यता दिली आहे. पाच वर्षात देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची देखील तरतुद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित पोस्ट

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज बीड सत्र न्यायालयाने  अर्ज फेटाळला

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे- पालकमंत्री शंभूराज देसाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्डेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.