vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लाभार्थींची यादी प्रसिद्ध..

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लाभार्थींची यादी प्रसिद्ध..

             सांगली, प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 750 अर्जांची तात्पुरती यादी व 250 अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड येथे जनतेसाठी उपलब्ध असल्याचे असे समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येवून दिनांक 31 ऑक्टोबर 2024 अखेर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. यानुसार रेल्वेच्या आसन क्षमतेच्या प्रमाणात 750 अर्जांची तात्पुरती यादी व 250 अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्हास्तरीय समिती उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात आली असून यास समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिली आहे. ही यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड येथे जनतेसाठी उपलब्ध आहे. तीर्थदर्शनासाठी जाण्याची तारीख निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहेत. त्यांच्याकडून तारीख प्राप्त होताच जाहीर करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदतपदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांवर अन्याय होणार नाही- मंत्री शंभूराज देसाई