vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

जळगाव, प्रतिनिधी : केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी नुकतेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली. या बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. त्यामध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे :नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड थांबा दानापुर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर थांबा (पुणे मार्ग)

महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर थांबा

रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta