vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

जालना प्रतिनिधी: लातुर येथे ८ एप्रिल २०२५ रोजी ११.३६ किलो मेफेड्रोन (एमडी) हाअमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागाने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केलाअसून या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून जालन्याचे अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक यांची नेमणुक करण्यात आली आहे

ड्रग्ज व्यापारातील प्रमोद संजीव केंद्रे (३५), जुबेर हसन मापक (५२), अहदशफी मेमन,, मोहम्मद असलम खान, मोहम्मद कलीम शेख, मोहम्मद वसीम शेख (३३),दिलावर अल्ताफ खान (३४), अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात विशेषसरकारी वकील अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक हे सर्व सुनावणीत फिर्यादी पक्षाच्यावतीने हजर राहुन खटल्याचा पाठपुरावा करतील, केंद्रीय अप्रत्यक्ष कर वसीमाशुल्क मंडळाच्या ८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार त्यांच्या नेमणुकीच्या अटी लागू राहतील. प्रकरणात प्रगती झाल्यास संबंधीत कार्यालयास माहिती देणे, निकालाची प्रमाणित प्रत पुरवणे, आणि नियुक्तीसंपल्यानंतर सर्व कागदपत्रे परत करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. या महत्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीबद्दल अ‍ॅड. दीपक नाईक यांचे अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी नवी मुंबईत मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन