vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

सातारा प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बाजार समित्या असून शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात, असे आवाहन सातारचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, समित्यांचे सचिव यांच्यासाठी सातारा येथे पणन विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पणनचे उप सरव्यवस्थापक. डॉ सुभाष घुले, सहाय्यक निबंधक संजय जाधव, डीएमआय अच्चुत सुरवसे, कृषि अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पणन मंडळाचे अधिकारी अमोल भोंग, महेश जगताप, प्रसाद भुजबळ, शशिकांत भरणे व सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.

बाजार समित्यांसाठी शेतकरी हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रीक म्हणाले, आजच्या बदलत्या काळात बाजार समितीने पायाभुत सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे कराव्यात. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, असे आवाहन केले.

कृषि पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी आयोजित कार्यशाळेची प्रस्तावना करुन पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी ई वाचनालय सुरु करणेबाबत आवाहन केले. सातारा जिल्ह्यातील शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतक-यांना उपयुक्त ठरतील अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व शेतक-यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी कामकाज करावे, असे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सूचित केले

सहायक निबंधक संजय जाधव यांनी पणन विभागाचे विविध कायदे व निधीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची माहिती दिली. केंद्रशासनाच्या डीएमआयचे अधिकारी अच्युत सुरवसे यांनी डीएमआयच्या बाजार समिती व शेतकरी यांचेसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय रॅंकींगमध्ये कोल्हापूर विभागात अनुक्रमे दोन व तीन क्रमांक आल्याबद्दल फलटण व लोणंद बाजार समितीचे सभापती, उप सभापती, पदाधिकारी. व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. अमोल भोंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

000

संबंधित पोस्ट

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…