vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सानपडा पोलीस ठाण्यातील किंमती मुद्देमालाचा लिलाव

सानपडा पोलीस ठाण्यातील किंमती मुद्देमालाचा लिलाव

नवी मुंबई प्रतिनिधी: नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाचा लिलाव करण्यासंबंधी मा. न्‍यायालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दिनांक २६ जून २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता सानपाडा पोलीस ठाणे प्रांगणात लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी दिली आहे.

या संदर्भातील मुद्देमालाची तपशीलवार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लिलावामध्ये विविध वस्तूंचा समावेश असून त्यात सोन्याच्या अंगठ्या, चेन, सोन्याची चमकी, सोन्याचे ब्रेसलेट तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे

सानपाडा पोलीस ठाण्यातील लिलावात काढण्यात आलेल्या किंमती मुद्देमालाचा तपशील पुढील प्रमाणे आहेत. 1. आरसीसीन क्र. 3637/1999 मुद्देमाल: 04.600 ग्रॅम सोन्याची अंगठी, 0.200 ग्रॅम नाकातली चमकी 2. आरसीसीन क्र. 3717/1997 मुद्देमाल: 6.000 .ग्रॅम 1 सोन्याची डिस्को चेन, 4.200 ग्रॅम सोन्याची चौरस आकाराची अंगठी, 12.000 ग्रॅम सोन्याचे काळया मण्याचे मंगळसूत्र, 3. आरसीसीन क्र. 799/1999 मुद्देमाल: 9.490 ग्रॅम 1 सोन्याची चेन 4. आरसीसीन क्र. 2852/1997 मुद्देमाल: 23.800 ग्रॅम 1 सोन्याची लगड. असा मुद्देमालाचा तपशिल आहे. अधिक माहितीकरिता सानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

या लिलाव प्रक्रियेसाठी इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि लिलावाच्या वेळेवर हजर राहावे, असे आवाहन नवी मुंबई सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.   उपसंचालक (माहिती)   कोकण विभाग, नवी मुंबई

संबंधित पोस्ट

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन