vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

रायगड प्रतिनिधी:- जिह्यातील प्रथम 01 ते 03 किंवा 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. त्यानुसार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी दि.20 जुलै 2025 पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या, सदनिका क्र.2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे चेंढरे, अलिबाग येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. रायगड रविंद्र भा. धनुर यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) या महामंडळामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी जिह्यातील प्रथम 01 ते 03 किंवा 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो.

वि‌द्यार्थ्याने शिष्यवृत्ती अर्ज करण्याचा अंतिम दि.20 जुलै 2025 हा असून त्यानंतर शिष्यवृतीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. अर्जासोबत अण्णा भाऊ साठे शिष्यवृती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उतीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड,7. आधारकार्ड ही कागदपत्रे जिल्हा कार्यालय, रायगड येथे सादर करावीत.

०००००००

संबंधित पोस्ट

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत

समृद्धीचा बॉयलर पेटला; एप्रिलअखेर एक टीपरुही गाळपाविना राहणार नाही – सतीश घाटगेगाळप हंगामाला प्रारंभ: १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह -२४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबिर

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे