vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

 मुंबई, प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

 राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000000

संबंधित पोस्ट

दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

vishwatmaklokswamivarta

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे*भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल…

पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिकस्तरावर चालना मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वार्षिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला; उपमुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका 23 माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के**अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम*