vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट

वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट

राज्य प्रतिनिधी -अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांचे पीककर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज हाडोळती येथे या श्री. पवार यांच्या घरी भेट देवून त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज भरले. तसेच शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी आमदार विक्रम काळे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बागवे, सहाय्यक निबंधक श्री. पालवे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे थकीत असलेले हाडोळती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे थकीत कर्ज व त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडे सुमारे 42500 रुपये सुपूर्द केले. तसेच या रक्कमेचा भरणा करून त्याबाबतचे प्रमाणपत्र श्री. पवार यांना सुपूर्द करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे सहकार मंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

*****

संबंधित पोस्ट

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ पुस्तकाचे प्रकाशन

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन