vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*

*पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*

       नवी  मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी 1700 मि.मी. व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरुळ सेक्टर-46, अक्षर बिल्डींगजवळ वारंवार गळती होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार, दि. 18 जुलै 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार दि. 18 जुलै 2025 सकाळी 10.00 वाजल्यापासून शनिवार दि. 19 जुलै 2025 रोजी पहाटे 04.00 वाजेपर्यंत 18 तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

          त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवार दि. 18 जुलै 2025 रोजी संध्याकाळचा व शनिवार दि. 19 जुलै 2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसेच शनिवार दि.19 जुलै 2025 रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे..

          तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन