vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

 

            अमरावती, द प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वडगांव तालुका, अचलपूर येथील वीरेंद्र प्रफुल्ल कंटाळे, (वय -अडीच वर्षे ) या बालकाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेला लागणारा संपूर्ण निधी हा जिल्हास्तरावरील कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी बालकाचे वडील प्रफुल्ल कंटाळे यांनी शासनाचे आभार मानले.

 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 या वयोगटातील मुलांची आरोग्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये शस्त्रक्रियेसाठी संदर्भित बालके निघतात, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये वीरेंद्रच्या पायाचा त्रास लक्षात आला. या त्रासामुळे त्याला मांडी घालून बसता येत नव्हते. यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सुमारे एक लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. वीरेंद्रला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

  अमरावती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ. श्याम गावंडे तसेच डॉ सुषमा सावलकर , राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक, अचलपूर व कर्मचारी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तातडीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

#मुख्यमंत्रीसहायतानिधी

संबंधित पोस्ट

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

22 मार्चपर्यंत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम;मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन..

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.