vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

बुलढाणा, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी, या संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली आहे.

प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ३१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. बाधित क्षेत्रातील पंचनामे जलदगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून दिली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी २४ जुलै रोजी प्रसारित केलेल्या तांत्रिक बुलेटिननुसार, अळीच्या जीवनचक्रावर आधारित एकात्मिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी केले आहे.

हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना: हुमणी अळी ओळखणे: हुमणी अळी इंग्रजी ‘C’ अक्षराच्या आकाराची असून, पूर्ण वाढ झाल्यावर ती तीन ते पाच सेंटीमीटर रुंद आणि पांढुरक्या रंगाची असते. ही अळी सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, मूग, ऊस, सूर्यफूल, मिरची आणि वांगी यांसारख्या पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. यामुळे पिके कमकुवत होऊन जमिनीवर कोलमडतात. पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी, बाधित झाडांची पाने पिवळी पडून सुकतात. सौम्य प्रादुर्भावासाठी जैविक नियंत्रण: जर शेतात हुमणी अळीचा सौम्य किंवा तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास, ‘मेटारायझियम’ (Metarizhium) या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. ४० मिली ‘मेटारायझियम’ १० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाजवळ टाकावे. तसेच, १ किलो ‘मेटारायझियम’ भुकटी १०० किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टर शेतात फेकावी. हे जैविक कीटकनाशक वापरताना शेतात पुरेशी ओल असल्याची खात्री करावी.

 तीव्र प्रादुर्भावासाठी रासायनिक नियंत्रण: हुमणी अळीचा तीव्र किंवा लक्षणीय प्रादुर्भाव आढळून आल्यास, स्थानिक तज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करावा. Fipronil 40% + Imidacloprid 40% या मिश्र दाणेदार कीटकनाशकाचे ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून झाडाच्या खोडाजवळ टाकावे. Thiamethoxam 0.9% + Fipronil 2% या मिश्र दाणेदार कीटकनाशकाचा १२ ते १५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत ओलावा असताना झाडाच्या खोडाजवळ वापर करावा.

शेतकऱ्यांनो, रसायनांचा वापर करताना लेबलवरील मार्गदर्शक सूचना व प्रमाणाचे काटेकोर पालन करावे. कोणतेही मिश्रण टाळून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत,” अशी ग्वाही ना.मकरंद पाटील यांनी यावेळी दिली.

0000000

संबंधित पोस्ट

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta