vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

 

छत्रपती प्रतिनिधी- जिल्ह्यातील पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्याबाबत शासननिर्णयात निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार स्वःताची ओळख उघड करु इच्छिणाऱ्या व नोंदीत असलेल्या ७८४ पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्र देण्यासाठी सोमवार दि.४ ते शुक्रवार दि.८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करुन सगळ्यांना ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी शासकीय वसतीगृह, घर घर संविधान अभियान, ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा आढावा घेतला. तृतीय पंथी अर्थात पारलिंगी व्यक्तिंसंदर्भात तक्रारनिवारण समितीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.१३ डिसेंबर २०१८ च्या शासननिर्णयानुसार तृतीयपंथ व्यक्तिंना ओळखपत्रे देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ७८४ व्यक्तिंनी स्वतःची पारलिंगी व्यक्ति म्हणून ओळख उघड करण्यास संमती दर्शविली आहे. या सर्व व्यक्तिंना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबवावी. त्यासाठी सोमवार दि.४ ते शुक्रवार दि.८ ऑगस्ट दरम्यान सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 

०००००

संबंधित पोस्ट

मेडिकलमध्ये आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकारआशियातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाचा कॉर्पोरेट लूक…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने व्याख्यानांतून गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रबोधन-मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न,खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी  –जिल्हाधिकारी किशन जावळे