vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

    अमरावती, प्रतिनिधी : तपोवनात राहणाऱ्या कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेसॲपद्वारे आधार सिडींग करण्यात आले. तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सहायाने खाते उघडण्यात आले.

  जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथील लाभार्थ्यांचे आधार बँक सिडींग करण्यासाठी समस्या निर्माण झाली. यातील कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडींग खाते उघडण्यासाठी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये 60 लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडिंग करण्यात आले.

  शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या डोळ्यातील बुबुळाचा फोटो घेऊन बँक खाते उघडण्यात आले. तसेच आधार सिडींग करण्यात आले.

 तसेच वयोमानाने लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात अडचणी येत असल्यास फेसॲपद्वारे त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे

0000

संबंधित पोस्ट

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबईतील गोवंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

vishwatmaklokswamivarta

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

मौजे मेघरे,कारविणे, गालसुर धबधबा व बाणगंगा,सायगांव धरणया पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी..

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta