vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणं, हे मोठं पुण्याईच काम आहे. लोकांचे प्रबोधन करून अवयवदान चळवळ अधिक गतिमान, व्यापक लोकचळवळ करूया” असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

केईएम हॉस्पिटलच्या सभागृहात (आरओटीटी ओ- एसओटीटीओ) संस्थेच्या वतीने जागतिक अवयवदान पंधरवडा निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, रुग्णालये, सेवाभावी संस्था तसेच अवयव रोपण केल्यानंतर विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्या, तसेच आरओटीटीओ- एसओटीटीओ मॉडेलचे मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

लोकांच्या मनात अवयवदानाबद्दल अकारण भीती असते, अशीच भीती पूर्वी रक्तदानाबद्दल होती. आता रक्तदान सर्वत्र केले जाते. अवयवदानाबद्दल असलेली भिती व गैरसमज सुद्धा दूर करून अवयवदान ही लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व पातळीवरून लोकाचे प्रबोधन, जनजागृती केली पाहिजे. प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करून किडनी, डोळे, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लोकांना आपण नवजीवन देवूया, असे आवाहन मंत्री.श्री.आबिटकर यांनी केले.

अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणारे झीटीसीसी, (आरओटीटी ओ- एसओटीटीओ), विविध रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था यांचे कार्य उत्तम असून येत्या वर्षभरात अवयवदानाची प्रतीक्षा यादी कमी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, आरओटीटी ओ- एसओटीटीओ चे संचालक आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर, बी.जे. मेडिकल कॉलेज, कमांड हॉस्पिटल पुणे, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूर, एआयआय एमएस नागपूर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे तसेच, री-बर्थ फाऊंडेशन, लिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.

अवयवदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित (एचएन रिलायन्स हॉस्पिटल) आणि डॉ. सुजाता पटवर्धन (केईम) यांना बेस्ट एनटीआरसी ॲवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*