vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु..

 

     नवी मुंबई प्रतिनिधी     नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात 24 सर्वसाधारण व 46 वातानुकुलीत अशा एकूण 70 बस मार्गावर प्रवाशी सेवा देण्यात येत असून या बसमार्गांवर दैनंदिन 2.27 लाख प्रवाशी प्रवास करीत आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशांना 50% सवलत दिल्याने सध्या परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये दैनंदिन महिला प्रवाशांची संख्या 1 लाख इतकी आहे.

परिवहन उपक्रमाच्या अटल सेतू MTHL मार्गावरुन चालणाऱ्या वातानुकूलित बसमार्ग क्र.116 तुर्भे आगार/नेरूळ बस स्थानक ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे खारकोपर तसेच बसमार्ग क्र.117 खारघर से.35 ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे पळस्पे फाटा, या मार्गांवर महिलांकरीता विशेष बससेवा गुरुवार, दिनांक 14/08/2025 पासून सुरु करण्यात येत आहे. सदर बसेसची वेळ खालीलप्रमाणे आहे.

मार्ग क्र. 116 ठिकाण : नेरुळ ब.स्थानक ते वर्ल्ड ट्रेड सेंटर वेळ : 08.05

ठिकाण : वर्ल्ड ट्रेड सेंटर ते नेरुळ ब.स्थानक

वेळ : 18.25

मार्ग क्र.117 ठिकाण : खारघर से.35 ते वर्ल्ड ट्रेड सेंटर वेळ : 08.00

ठिकाण : वर्ल्ड ट्रेड सेंटर ते खारघर से.35

वेळ : 18.50

तरी जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा- ॲड. धर्मपाल मेश्राम पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर..

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

नवी मुंबई महानगरपालिका विभागात पाणीपुरवठाविषयक जाहीर आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 % पाणी कपात ..