vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

नागपूर प्रतिनिधी: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आश्वस्त केले.

नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली.यावेळी २८० लेखी निवेदने स्वीकारण्यात आली.

यावेळी नागरिकांनी व्यक्तिशः भेट घेवून संवाद साधत आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्या लेखी स्वरुपात सादर केल्या.विविध शिष्टमंडळांनीही यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. जनतेच्या समस्या, मागण्या समजून घेत यावर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देशही दिले.

०००

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

वारणा धरणात 20.77 टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार