vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जालना, प्रतिनिधी : मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस 29 ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामिण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचवीणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, यूवक व युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या क्रिडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांडुचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पात्र खेळाडुंनी आपल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत दि. 25 ऑगस्ट, 2025 पर्यत कार्यालयाच्या jalnadso@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत. तसेच दि 29 ऑगस्ट 2025 रोजी विविध स्पर्धेचे आयोजनामध्ये पुढील खेळात सहभाग घ्यावा.यामध्ये लॉनटेनिस, बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, स्केटींग, क्रिकेट, बाडमिंटन, सेपाक टकरा आदी स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच दि. 30 ऑगस्ट, 2025 रोजी सरस्व़ती भुवन विद्यालय, जालना येथे चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 31 ऑगस्ट, 2025 रोजी संडे ऑन सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथुन सुरुवात होवून ते मोतीबाग समारोप होणार आहे. वरील स्पर्धामध्ये सहभाग घेण्याकरिता दि.25 ऑगस्ट, 2025 पर्यत कार्यालयात नोंदणी करावी. या स्पर्धेतील विजेत्या संघाना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तरी खेळाडुंनी मोठ्या प्रमाण सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयात संपर्क साधावा.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

vishwatmaklokswamivarta

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात नागपूर तसेच महिला गटात पुणे विजयी* 

नवी मुंबई नमुंमपा चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत गावकी विभागात दिवा कोळीवाडा 40+ संघशहरी विभागात युनायटेड स्पोर्टस, ऐरोली संघ विजयी