vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

येत्या शुक्रवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

येत्या शुक्रवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन

बुलढाबुलढाणा प्रतिनिधी-ढाण्यात पहिल्यांदाचपत्रकारांनी ‘वृत्तेश्वर’ गणेश मंडळाची स्थापना करून विविध उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवारी पत्रकार भवन परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘वैभव – विशाल’ या नावाने गझल संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज्य शासन पुरस्कार प्राप्त, चित्रपट गीतकार वैभव देशमुख आणि लोकप्रिय गझलकार विशाल मोहिते यांच्या गझल आणि कवितांची ही अवीट मैफिल असणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहून, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 सण – उत्सव सामाजिक एकात्मियतेचे प्रतीक आहे. उत्सव काळात मानवी मूल्यांचा प्रचार आणि प्रसार होत असून, जीवनाला स्तकर्माची दिशाही प्राप्त होते. याच भावनेतून पत्रकार संघातर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एक असलेल्या भजन स्पर्धेची प्रथम फेरी पार पडली. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांची स्पर्धा शनिवार, ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. रविवार, ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस दल आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला आणि निंबध स्पर्धेचे बक्षीस वितरण शहरातील कारंजा चौकस्थित प्रभा हॉल येथे पार पडेल. यानंतर, सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन परिसरात वैभव- विशाल गझल संध्या ही मैफिल रंगणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे ज

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला