vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

 

ठाणे, प्रतिनिधी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी संजय गोविलकर यांच्याकडून या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. संजय गोविलकर यांच्या कार्यकाळातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय धाडसी कारवाया केल्या.

     यापूर्वी श्री.सोनवणे हे महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर धडाडीने काम केले आहे, ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमांची सखोल माहिती आहे. तसेच सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नागपूर शहर, मुंबई शहर, नाशिक शहर तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून श्री.सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि लाचखोरीला रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

000000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभाराव्यात – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शना’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta