vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणबी प्रमाणपत्रासाठी नवीन नियम लागणार..

कुणबी प्रमाणपत्रासाठी नवीन नियम लागणार..

राज्य प्रतिनिधी-…मराठा समाजबांधवांना हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कायदा करता येईल, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूत्रांना अनुसरून राज्य सरकारने एक मसुदा तयार केला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, या मसुद्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.

 

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमिती, अडव्होकेट जनरल, तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीनंतर विखे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयातील निकाल, निकष यांचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येणार असून, त्यादृष्टीने पुढील वाटचाल सुरू आहे. सरकारची भूमिका म्हणजे निर्णय न्यायालयाच्या चौकटीत टिकला पाहिजे.

…मराठा समाजबांधवांना हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कायदा करता येईल, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूत्रांना अनुसरून राज्य सरकारने एक मसुदा तयार केला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, या मसुद्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.

मराठवाड्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने मसुदा तयार केला आहे. त्यासाठी अडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा होणार आहे. आरक्षणासंदर्भात नवीन शासन निर्णय जीआर काढण्याची शक्यता असून, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभ प्रणाली लागू केली जाणार आहे; तसेच नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्रही ग्राह्य धरले जाईल.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास न्यायालयाने नियम व अटींसह परवानगी दिली होती. आंदोलकांनी रस्त्यावर अडथळे निर्माण केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने आंदोलनाला वैद्यकीय व अन्न पुरवठा परवानगी दिली, तसेच १२ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना जरांगे यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्या आहे.

छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश नको. ओबीसी आरक्षण बचावासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षण देणे हे मागास आयोगामार्फत होऊ शकते, मुख्यमंत्र्यांच्या अधीन नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

संबंधित पोस्ट

दिल्ली विधानसभा निवडणूक -आप’ला सर्वात मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे — डॉ. भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta