vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

विदेश प्रतिनिधी- भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सुरू झाले  हिंसक आंदोलन: सोशल मीडियावरील बॅनविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनामुळे देशात सत्तांतर होण्याची चिन्हं आहेत. शेजारील देशात सुरु असलेल्या आंदोलनानं ओली सरकार संकटात सापडलं आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीदेखील नुकताच राजीनामा दिला आहे. सरकारनं कालच सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही तरुणाईचा रोष कमी झालेला नाही. आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी देश सोडून दुबईला पळून गेल्याचे सूत्रांची माहिती  . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय उपचारांच्या बहाण्यानं ते दुबईला जाऊ शकतात. अशी चर्चा होती परंतु नेपाळमधील खासगी विमान कंपनी असलेल्या हिमालय एअरलाइन्सचं विमान स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी  देश सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे . सध्याच्या घडीला जेन झीचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. या आंदोलनानं देशात क्रांती घडू शकते. नवीन चेहरा पंतप्रधानाचा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये सुरु असलेलं तरुणाईचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. तरुणांनी संसदेत घुसून दोन्ही सदनांना आग लावली. सध्याच्या घडीला संपूर्ण संसद आंदोलकांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे संपूर्ण देशात राजीनामांचा सिलसिला सुरु झाला आहे. आंदोलकांचा धसका घेत मधेश प्रदेशचे मुख्यमंत्री सतीश सिंह यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच लुंबिनी, गंडकी, सुदूर पश्चिम प्रदेशसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांनी राजीनामे दिले आहेत. राजधानी काठमांडूसह अनेक राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहेत. जाळपोळ, दगडफेक यांच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं राजकीय संकट निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे

संबंधित पोस्ट

🇨🇦 कॅनडाचा स्वबळावर संरक्षणाचा मोठा निर्णय: आर्क्टिक सीमांच्या सुरक्षेसाठी २६ अब्ज डॉलर्सची तरतूद!

इस्त्रायल-हमासच्या युद्धबंदीनंतर आता हमासने शांततेच्या मार्गाने पहिले पाऊल. हमासने सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका केली

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाची सूचना* मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी .

भारत, यूके, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये झालेल्या प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६- दुबई’ला जागतिक प्रतिसाद! – दुबई जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वाधिक पसंतीचे केंद्र

vishwatmaklokswamivarta

भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे• बार्बाडोस येथील ६८ व्या सी.पी.ए. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात भारतातील राज्य विधानमंडळ पीठासीन अधिकारी यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण धोरण विषयक चर्चेचे 10 वे सत्र नवी दिल्लीत संपन्न