vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर विकास आराखडा आणि पैठण येथील क्षेत्र पैठण, आपेगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडा बाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.   आमदार प्रशांत बंब,आमदार विलास भुमरे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .अंकित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, कन्नड उपविभागीय अधिकारी अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार आणि विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

 आगामी कालावधीत भाविकांना सुविधा, वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक सेवा सुविधा,पायाभूत सुविधा उपलब्धता, रस्ते- भक्त निवासगृह, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षित अन्न याबाबत भविष्यकालीन नियोजन करून आराखडा सादर करावा. कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना पुरेशा सेवा सुविधा तीर्थक्षेत्र ठिकाणी उपलब्ध करता येतील.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा अग्रस्थानी असून या ठिकाणी येणारा भाविक हा सर्व सुविधायुक्त वातावरणात रहावा. शहराची आध्यात्मिक आणि पर्यटनाची प्रतिमा वृद्धिंगत व्हावे यासाठी भविष्यकालीन नियोजन करत असताना प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या आणि अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी नियोजन करून आराखडा सादर करावा. राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून प्राप्त अधिक निधीचा वापर सुविधा विकासासाठी करून जिल्ह्याच्या विकासासाठी करता येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. तीन दिवसाच्या आत प्रत्येक संबंधित विभागाने आपल्या विभागाअंतर्गत असलेल्या भविष्यकालीन उपाय योजनेचे प्रस्ताव सादर करावेत.याचे सादरीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसेच केंद्राच्या इतर विभागाकडे केले जाणार आहे. यामध्ये अन्न औषध प्रशासन ,आरोग्य विभाग, वन विभाग सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरातत्व आणि पर्यटन विभाग या विभागाने विशेष काळजी घेऊन विभागाअंतर्गत विकास कामाचे सुधारित प्रस्ताव क्षेत्र भेटी क

 करून आवश्यक असणाऱ्या सुधारणा सविस्तर सादर करावेत आणि हे प्रस्ताव सादर करत असताना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचे स्पष्टीकरणे देण्यात यावे असे सूचित करण्यात. आमदार प्रशांत बंब यांनी पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागांना सूचित करून याबाबतचे निर्देश दिले. तसेच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी पैठण आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा एकत्रित सादर करत असताना सर्व विभागाने समन्वयाने आवश्यक असणाऱ्या सुविधांचा प्रस्ताव तयार करून आराखड्यात अंतर्भूत करण्याचे निर्देशही यावेळी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन  मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा…

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

महाराष्ट्र शासनाने श्रीगणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरूपात व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने,

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा किनगाव येथे राज्यस्तरीय शुभारंभ-१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta