vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी- शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 38 हजार प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

 या योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज २६ऑक्टोबर पर्यत http://hmas.mahait.org वर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्यान विभागाच्या सहायक संचालक कांचन जगताप यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यात डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध-अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता…

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा- मुख्य सचिव सुजाता सौनिक

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta