vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

*भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

 

चिखली प्रतिनिधी  -: शहरातील बस स्थानक परिसरात भटकंती करून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे वृद्ध आजोबांची सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेत त्या निराधार वृद्धाला मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली येथे केले दाखल.

सदर वृद्ध आजोबा हे अकोला जिल्ह्यातील असून ते भटकंती करत चिखली बस स्थानक परिसरात आढळून आले. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव यांनी आपुलकीने सर्व विचारपूस केली त्यांना दोन मुलं आहेत पण ते त्यांचा सांभाळ करत नाही हि किती शोकांतिका आहे. ज्या वडिलांच बोट धरून आपण हे जग पाहतो त्यांच्या नावाने ओळखले जातो म्हातारपणी आपण त्यांचा सहारा न बनता त्यांना भटकंती करण्यासाठी मजबूर करतो किती भयावह परिस्थिती आहे.

आजोबांच ऐकताच सुमेध जाधव यांनी माजी सरपंच भरत जोगदंडे, प्रहार चे धनंजय जटाळे, पुरुषोत्तम चिंचोले, गणेश श्रीवास्तव यांच्या सहकार्याने त्या निराधार आजोबांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश मिळून दिला.

तसेच मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी सर्व सोईसुविधा सह निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

निरोगी दीर्घायुष्यासाठी सायकल चालविणे हितकारक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे