vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

निर्मल भवन येथे राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी सेवा समायोजन कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस एड्स नियंत्रण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभर एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १,६०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी २५ ते ४० वयोगटातील असून त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे. भविष्यात एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता, या कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

रस्त्यांवरील माती सफाई करून वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबईत सर्वत्र सखोल स्वच्छता…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…