vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन

बुलढाणा, प्रतिनिधी : इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व सेवाकार्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 15) दुपारी 3 वाजता टीबी हॉस्पिटल (क्षय आरोग्य धाम) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना.मकरंद जाधव, वस्त्रोद्योग मंत्री तथा सह पालकमंत्री, ना.संजय सावकारे, कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर हे राहणार आहेत. विधान परिषद सदस्य किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, विधानसभा सदस्य आ.चैनसुख संचेती, आ.डॉ संजय कुटे, आ. संजय गायकवाड, आ.श्वेताताई महाले, आ.सिद्धार्थ खरात, आ.मनोज कायंदे यांची विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती राहणार आहे.

तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक न‍िलेश तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक तथा पदसिद्ध उपाध्यक्ष (इंडियन रेड क्रॉस सोसायटी) डॉ. दत्तात्रय बिराजदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, बुलडाणा अर्बन अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, दिव्यांग व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश छाजेड, भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे सचिव अनिल नावंदर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, क्षय आरोग्य धाम चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण, डॉ. दीपक लध्दड, आयएमएचे डॉ. केदार शर्मा, डॉ. अजित शिरसाठ, निमा संघटनेचे डॉ.गजानन पडघान, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ चे डॉ. राजेश्वर उबरहंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संबंधित पोस्ट

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख_ निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

कफ सिरपची गुणवत्ता आणि तर्कशुद्ध वापरासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांची राज्यांसोबत उच्च-स्तरीय बैठक

राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार, सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta