vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व पौष्टीक तृणधान्य पिकांच्या प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळेत अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाचे तंत्र अधिकारी अजय वाढे यांनी केले आहे..

या योजनेअंतर्गत हरभरा आणि ज्वारी पिकांसाठी बियाणे अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत. हरभरा 10 वर्षांआतील वाणाकरिता 2073.4 क्विंटल बियाण्यांचे वितरण 50 रुपये प्रति किलो अनुदान दराने करण्यात येणार आहे. तर 10 वर्षांवरील वाणाकरिता 25 रुपये प्रति किलो अनुदान असेल. तसेच ज्वारी 10 वर्षांआतील वाणाकरिता 40 क्विंटल बियाणे 30 रुपये प्रति किलो अनुदान दराने, आणि 10 वर्षांवरील वाणाकरिता 170 क्विंटल बियाणे 15 रुपये प्रति किलो अनुदान दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बियाणे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व कृभको या संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, सातबारा उतारा व आधार कार्ड असणे आवश्यक असून, एका शेतकऱ्याला केवळ 1 हेक्टर मर्यादेतच प्रमाणित बियाण्याचा लाभ देण्यात येईल.

000000

संबंधित पोस्ट

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त बलिदान दिन भाजपा जालना महानगर च्या वतीने साजरा”संकल्प से सिद्धी”- मोदी सरकारचे यशस्वी ११ वर्ष अभियानांतर्गतजालना महानगरमध्ये मंडळस्तरावर संकल्प सभा व वृक्षारोपण

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे

चैत्राच्या सोनेरी पहाटेत, आनंदाची गुढी उभारूया, नववर्षाचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम