vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली,चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

मुंबई, प्रतिनिधी– चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांनी सिने, नाट्यसृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते रसिकांच्या मनांत चिरंतन राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सतीश शाह यांनी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत काम करताना रसिकांची दाद मिळवली. विनोदी, सहज-सुंदर, निखळ मनोरंजनात्मक भूमिका ते चरित्र अभिनेता अशी त्यांची वाटचाल राहिली. निखळ आणि भूमिकांना न्याय देणारा प्रामाणिक अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. मराठी चित्रपट सृष्टीच्या गौरवात भर घालणाऱ्या स्व. दादा कोंडके यांच्या चित्रपटात त्यांनी भूमिका वठवून मराठी रसिकांचीही दाद मिळवली. शाह यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची हानी झाली आहे. या क्षेत्रातील पिढ्यांना जोडणारा एक मार्गदर्शक दुवा निखळला आहे. शाह यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, या सर्वांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

संबंधित पोस्ट

१९३५ वर्ष पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष. जिल्हाभरात 682 अधिकारी, 288 लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी 

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवडअरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…