vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

*सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

 

मुंबई, प्रतिनिधी : 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (150व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्याराष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षी “स्वराज्य: एकतेचा धागा” यासंकल्पनेवर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. या चित्ररथात अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शन घडते. त्यांच्या मागे वारकरी संप्रदायातील वारकरी यांची मूर्तीतर पार्श्वभूमीवर मराठा आरमारातील प्रसिद्ध गुराब नौका दर्शविण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात आली आहे.या चित्ररथासोबत 14 कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार असून, महाराष्ट्राच्याविविधतेतून एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर राज्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करेल

तसेच, 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारत पर्व अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागांद्वारे संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचामुख्य कार्यक्रम 7 -8 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडेल.महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्यासाठी गोंधळनृत्य, कोळी नृत्य, लावणी, तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले सुमारे 15ते 20 कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे.या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचीअसून यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहेया उपक्रमांद्वारे महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच

आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.

०००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी — जिल्हाधिकारी किशन जावळे

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

द केरळ स्टोरी’ प्रमाणे ही कोकण स्टोरी आहे. 🚩 घर वापसी 🚩

vishwatmaklokswamivarta