vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025निवडणूक प्रचार व प्रसिद्धीकरिता वापरण्यात येणाऱ्यावस्तू व सेवांचे दर निश्चितीबाबत आढावा बैठक संपन्न

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025निवडणूक प्रचार व प्रसिद्धीकरिता वापरण्यात येणाऱ्यावस्तू व सेवांचे दर निश्चितीबाबत आढावा बैठक संपन्न

        ठाणे, प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये निवडणूक प्रचार व प्रसिद्धी करिता वापरण्यात येणाऱ्या वस्तू व सेवांचे दर निश्चित करण्याकरिता आढावा बैठक संपन्न झाली.

  या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) रुपाली भालके, तहसिलदार सचिन चौधर, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त नितीन आहेर, सहायक कामगार आयुक्त ठाणे चेतन जगताप, उप अभियंता (विद्युत) प्र.श.शिवदास, सहायक अभियंता (विद्युत) नि.ह. पगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी मन्यवर उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व राजकीय पक्षातील प्रतिनिधींशी या दरपत्रकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास सूचविण्याचे आवाहन केले. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी निवडणूक कामी पुरविण्यात येणाऱ्या मनुष्यबळाच्या दराविषयी बोलताना सांगितले की, हे जुने दर असून नवीन दर काढण्यात आले असल्यामुळे नवीन दर आकारण्यात यावे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ढोल, ताशा पथकाच्या दर आकारण्याबाबत फेरविचार व्हावा, असे आवाहन केले. शेवटी सर्व सूचना समजून घेतल्यानंतर, निवडणूक खर्च दरपत्रकाबाबत फेरविचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

000000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न-जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार लयलूट …

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta