vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाची 21 वसतिगृहे आहेत. यामध्ये 1 हजार 364 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहे व निवासी शाळांतील उर्वरित रिक्त जागा शंभर टक्के भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आणि के. पी. मुधाळे, जिल्ह्यातील वसतिगृहांचे अधीक्षक आदि उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा व वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवावी. या रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करावे. याबाबतचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. तसेच, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच, प्रवेशित विद्यार्थ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे द्यावेत, असे त्यांनी सूचित केले.

या बैठकीत शासकीय वसतिगृहातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेशस्थिती, शासकीय इमारत बांधकाम व दुरूस्ती, वसतिगृह बांधकामासाठी जमीन प्राप्त असलेल्या परंतु अद्याप इमारत बांधकाम सुरू न झालेली वसतिगृहे, सामाजिक न्याय भवन, सांगली येथील इमारतीच्या डोम दुरूस्ती, वसतिगृहातील सोयी सुविधा, वसतिगृह प्रवेशितांची आरोग्य तपासणी, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

त्‍या’ निर्णयाविरोधात विमाशि संघाचे धरणे आंदोलन१ फेब्रुवारी २०२५ रोजी बोर्ड कार्यालयासमोर निदर्शने

vishwatmaklokswamivarta

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा सत्याचा मोर्चा सुरू

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख – जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी…!

vishwatmaklokswamivarta