vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी): जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडुन त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करतात. त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी रब्बी हंगाम 2025 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एम.डी. ढगे यांनी केले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे. दिनांक 20 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम 2025 मध्ये बुलढाणा जिल्ह्याकरीता ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी शेतकरी स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली जवळपास अर्धा हेक्टर जमीन (40 आर) क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

 

सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आहे. पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा व 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने   

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका..

vishwatmaklokswamivarta

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..