vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

            सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. तथापि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

दरम्यान, या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दि. २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दि. ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी दि. ८ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे – नियमित शुल्कासह ८ डिसेंबर २०२५पर्यंत, विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत, अति विशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.

३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.