vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती धोरण मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या वर्षाकरीता बुलढाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) मार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार योग्य ठरलेल्या रेती घाटांसाठी तयार करण्यात आलेला प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 हा अहवाल बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://buldhana.gov.in येथे तसेच दिलेल्या क्यू-आर कोडद्वारे पाहता येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांनी अहवालाबाबत आपले अभिप्राय, सूचना अथवा निवेदने जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे 30 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 तसेच नागरिक आपले अभिप्राय dmobul@gmail.com या ई-मेल पत्त्यावरही पाठवू शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध शाळांना दिल्या* *भेटी* 

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महानगरपालिका आणि अँटॉप हिल पोलिस, वाहतूक पोलिस  यांच्या संयुक्त कारवाईने 10 वर्षांनंतर दुपदरी रस्ता झाला मोकळा..

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश