
नांदुरा नगरपरिषद निवडणूक: भाजपाची सरशी; मंगला मुऱ्हेकर नगराध्यक्षपदी विजयी
बुलढाणा, प्रतिनिधी: नांदुरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले आहे. भाजपाच्या उमेदवार मंगला सुधीर मुऱ्हेकर यांनी १२,०५० मते मिळवून नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. एकूण २५ सदस्यांच्या या सभागृहात भाजपाने ११ जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर आकोट विकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी २ जागांवर विजय मिळवला आहे.
प्रभागनिहाय सविस्तर निकाल,प्रभाग क्रमांक १ मधून आकोट विकास आघाडीचे अजय सिताराम भिडे (१,२६० मते) आणि अश्विनी दिपक गायकवाड (७०५ मते) विजयी झाले आहेत. प्रभाग २ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिव्यता सुनिल तांदळे (१,१२१ मते) आणि संतांष पांडूरंग खराडे (९२४ मते) यांनी यश मिळवले. प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले असून निखत कौसर शेख अन्वर (१,२६१ मते) आणि खा जुबेर खा सफदर खा (१,१०३ मते) निवडून आले आहेत.
प्रभाग ४ मध्ये भाजपाच्या हर्षा शिवशंकर हिवाळे (१,०९५ मते) आणि अपक्ष उमेदवार लाला दिनकर इंगळे (१,०१४ मते) विजयी झाले. प्रभाग ५ मधून भाजपाच्या विमलबाई राजाराम वानखडे (१,२५८ मते) आणि आकोट विकास आघाडीचे अजय सिताराम घनोकार (१,०९३ मते) यांनी विजय संपादन केला. प्रभाग ६ मध्ये शिवसेनेचे रोशन अरुन पांडव (७७९ मते) आणि भाजपाच्या माधुरी प्रमोद खोंड (१,४४० मते) विजयी झाले. प्रभाग ७ मधून आकोट विकास आघाडीच्या कल्पना अर्जुन वाकोडे (१,१५० मते) आणि भाजपाचे रामसिंह रमेशसिंह ठाकूर १,०४० मतांनी निवडून आले आहेत.
प्रभाग ८ मध्ये भाजपाच्या भावना उमेश इंगळे (१,२०० मते) आणि आकोट विकास आघाडीचे प्रणव राजेश एकडे (९५५ मते) विजयी झाले. प्रभाग ९ मध्ये भाजपाने दोन्ही जागा जिंकल्या असून अनिल कैलास जांगळे (१,३८६ मते) आणि मेघा राहूलकुमार गोठी १,४०२ मतांनी विजयी झाले. प्रभाग १० मधून आकोट विकास आघाडीच्या मेहनाज परवीन मोहम्मद मुजम्मिल फुरकान (९७५ मते) आणि अपक्ष खान आबेदाबी सफदर (८१८ मते) विजयी झाले. प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या श्रद्वा पवन खैरे (१,२७९ मते) आणि अर्चना संदिप तळोले (१,११२ मते) यांनी विजय मिळवला. शेवटच्या प्रभाग १२ मध्ये आकोट विकास आघाडीच्या शितल हरिष काटले (१,४०३ मते) आणि गायत्री गोकुल खेडकर (१,४३९ मते) विजयी झाल्या, तर प्रभाग १२ (क) मधून शिवसेनेचे विनायक प्रकाश बोडखे (९०९ मते) विजयी झाले आहेत.
000



