vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा..

मुंबई, प्रतिनिधी

नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा आणि नवे संकल्प उरात बाळगून नविन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, २०२५ हे वर्ष राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, आता २०२६ मध्ये आपल्याला अधिक वेगाने घोडदौड करायची आहे. सरत्या वर्षातील यशाचा वारसा पुढे नेत, नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.

नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*