vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केली आहे.महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

या शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन..

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..