vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, प्रतिनिधी- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पदक’, तसेच उल्लेखनीय सेवेसाठी विविध विभागांतील ५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. हे सन्मान महाराष्ट्राच्या पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे, शौर्याचे आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावाचे प्रतीक आहेत.

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अधिकारी व जवानांचा हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. विशेषतः वीरता पदक मिळविणाऱ्या जवानांनी दाखविलेल्या धैर्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अधिक दृढ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुनश्च अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

०००

 

संबंधित पोस्ट

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ, पुढचे १५ महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी.

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”