vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे…

मुंबई, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या

या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.

000

संबंधित पोस्ट

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार