vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर’ निमित्त नवी मुंबईत सखोल स्वच्छता मोहीमा…

‘हिंद-दी-चादर’ निमित्त नवी मुंबईत सखोल स्वच्छता मोहीमा…

     नवी मुंबई प्रतिनिधी –     श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करीत ‘हिंद-दी-चादर’ च्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यास सुरूवात केलेली आहे.

          या अनुषंगाने आज तुर्भे विभागात सेक्टर 9 सानपाडा गुरूव्दारा परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

          त्याचप्रमाणे सेक्टर 7 घणसोली येथे कै.संजय बालाजी पाटील मैदानात प्लास्टिक फ्री मैदान ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दैनंदिन स्वच्छता कार्यात मैदानांची स्वच्छता हा विषय समाविष्ट नव्हता, मात्र मैदानांचीही ठराविक कालावधीनंतर नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी असे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत मैदान स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.

          यासोबतच घणसोली पाम बीच मार्ग व पदपथ यावरील माती जमा करून रस्ता व पदपथ पुनर्प्रक्रियाकृत पाण्याने धुवून घेण्यात आला. या स्वच्छता मोहीमा सर्वच विभागांमध्ये हिंद-दी-चादर या शासनामार्फत आयोजित महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राबविण्यात येत आहेत.

0000

संबंधित पोस्ट

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta