vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी

चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

 

जालना, प्रतिनिधी: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय जालना यांच्या वतीने आयोजित डिजिटल चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असुन, यामुळे नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळणार असुन, या योजनांचा लाभ घेण्यास देखील मदत होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजना, पीएम सुर्यघर मुफ्त बीजली योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, बालविवाह प्रतिबंध कायदा:2006, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजनांचा समावेश आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या/मेढ्यांचे गट व दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सौर उर्जा संयंत्र बसविणे, ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनांचा समावेश आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (नवीन विहिर व जुनी विहिर दुरुस्ती), अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या मेढ्यांचे गट व दुभत्या जनवरांच्या गटाचा पुरवठा करणे, रमाई आवास योजना (शहरी व ग्रामीण) आणि अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींकरीता तालुकास्तरावर 100 शासकीय निवासी शाळा या योजनांवर आधारित भित्तीपत्रिकांचे देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच या डिजिटल चित्ररथाद्वारे जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांनी तयार केलेल्या बालविवाह मुक्त जालना, वन स्टॉप सखी सेंटर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आणि अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना या योजनावर आधारित लघु माहितीपट देखील दाखवून प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ, लघु माहितीपट आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ निरिक्षक गणेश अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, साक्षी उगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी श्री. कुलकर्णी, संतोष मुसळे, उपसंपादक (अ.का.) मिलिंद तुपसमिंद्रे, श्रीमती पुष्पा धनाईत, प्रतिभा इंगळे, विष्णु जायभाये, संतोष पाखरे, महिला बाल विकास विभाग आणि सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

*****

संबंधित पोस्ट

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

*नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी राज्यस्तरीय ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

विशेष वृत्त :राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे..

vishwatmaklokswamivarta

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

vishwatmaklokswamivarta