vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

 

जालना : प्रतिनिधी-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बीपीटीएच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जालना येथील धरती जनसेवा प्रतिष्ठान अंतर्गत चालणाऱ्या ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने यंदाही उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकालाची नोंद करण्यात आली आहे.

   या परीक्षेत प्राजक्ता गायकवाड हिने 73.5 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मनीषा नागवे हिने 72 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर साक्षी दुबे हिने 66.37 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.    विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णकुमार सिंग, उपप्राचार्या डॉ. निधी शर्मा तसेच डॉ. राम अवतार, डॉ. अमर डामले, डॉ. किरण कुमार, डॉ. शाम वायाळ, डॉ. गौरी सॉर्टी, डॉ. डीसूझा बेनेडीन आणि डॉ. संदेश लोंढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. एस. घाडगे, प्रशासकीय अधिकारी श्री. भागवत शिंदे आणि प्रा. विजय जऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

संबंधित पोस्ट

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया