vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण महामंडळ, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण महामंडळ, नाथपंथीय समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ महामंडळ, लोहार समाजासाठी ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज महामंडळ आणि विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ अशा ६ नवीन उपकंपन्यांची स्थापना केली असून या सर्व उपकंपन्या वसंतराव नाईक महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहेत.

या महामंडळांमार्फत सध्या चार महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये पहिली योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना असून याची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत आहे; यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे लागते. दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा योजना असून यामध्ये नोंदणीकृत गटांना १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते, ज्यासाठी सदस्यांची वयमर्यादा १८ ते ४५ वर्षे आणि नॉन-क्रीमिलेअरची उत्पन्न मर्यादा ८ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. तिसरी योजना १ लाख रुपये थेट कर्ज योजना असून यामध्ये महामंडळाकडून थेट कर्ज दिले जाते, ज्यासाठी ग्रामीण भागासाठी ९८ हजार व शहरी भागासाठी १ लाख रुपये उत्पन्न मर्यादा आणि दोन जामीनदारांची आवश्यकता असते. चौथी योजना २५% बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जात असून यासाठी १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांनी आपले प्रस्ताव कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जात असून लाभार्थ्यांनी आपले जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड आणि व्यवसायाचे कोटेशन यांसारखी सर्व मूळ कागदपत्रे महामंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे. यापूर्वी कोणत्याही कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या https://vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक श्री. पी. एम. झोंबाडे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई,पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळाव लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद