vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहेसन 2003 पासून सातत्याने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत जागतिक स्तरावरील (QS World University Ranking) पहिल्या 200 क्रमांकातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते

योजनेत 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असून त्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास खर्च, शिक्षण फी, निर्वाह भत्ता तसेच आकस्मिक खर्चाचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएच.डी.साठी 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर नमूद असलेले MD व MS अभ्यासक्रमच पात्र मानले जातील

इच्छुक विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो पूर्ण भरून सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन*

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम–अमरधान स्मशाभूमीतील संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण @ संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मान्यवरांना पुरस्कार, स्वच्छतादुतांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनाची पूर्व तयारी आढावा बैठक…

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी….

vishwatmaklokswamivarta